हरियाणासाठी आपचे 22 उमेदवार जाहीर

नवी दिल्ली – हरियाणा विधानसभेसाठी आम आदमी पार्टीने 22 उमेदवार उभे करण्याचे निश्‍चित केले आहे. भाजपचे मनहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आव्हान देण्यासाठी “आप’ने ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचे ठरवले आहे. खट्टर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये बहुमत मिळवले होते. याही वेळी भाजपच्यावतीने हरियाणातील मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून खट्टर यांचेच नाव आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात भाजपच्या सरकारला पुन्हा मोठे मताधिक्‍क्‍य मिळाले. त्यावेळी हरियाणामध्ये कॉंग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यातही हरियाणा कॉंग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याने खट्टर सरकारला मोठे आव्हान देण्यासाठी ही निवडणूक लढवणे आवश्‍यक असल्याने “आप’ने रिंगणात उडी घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.