नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत २०९ कोरोनाचे प्रकरणे समोर आल्याचे म्हंटले आहे. त्यापैकी १०८ जण मरकरजमध्ये सहभागी असल्याचे ते म्हणाले तर, ५१ जण विदेशातील असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान काश्मीरमध्ये पहिल्या कोरोनाबाधिताला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
आता जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोनाचे ७० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी असणाऱ्या ९ हजार जणांना क्वारेन्टाईन करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत १ हजार ९६५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच मागच्या २४ तासात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १५१ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ हजार ४०० जण तबलिगीमध्ये सहभागी आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यापैकी १ हजार ३०० जणांची ओळख पटवण्यात आली आहे. तसेच या सर्व रुग्णांना विलीगीकरण कक्षात दाखल काण्यात आल्या आहे, अशी माहिती त्यांनी दिली.