सोलापूर महापालिकेतील 218 कर्मचारी होणार सेवेत कायम

सोलापूर: महापालिकेत कार्यरत असणाऱ्या 450 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रश्न 2008 सालापासून प्रलंबित होता. यासंदर्भात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत नगरविकास राज्य मंत्री रणजीत पाटील यांच्यात मंत्रालय मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत 450 पैकी 218 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय झाल्याची माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली.

बैठकीत 193 बिगारी, 5 झाडूवाले, 20 वाहनचालकांना अधिसंख्य पद निर्माण करून सेवेत कायम करण्याचा निर्णय झाला. 2008 साली महापालिकेतील 864 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात बुधवारी झालेल्या बैठकीत 218 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत निर्णय झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव महापालिकेकडून 5 फेब्रुवारीपर्यंत नगर विकास मंत्रालयाकडे पाठविण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला ना. रणजीत पाटील यांनी दिले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×