217 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई

मंचर- शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी पूर्ण झाली असून निवडणुका भयमुक्त वातावरणात होण्यासाठी घोडेगाव पोलिसांनी 217 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. तसेच 15 जणांना तडीपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरिक्षक प्रदीप पवार यांनी दिली.

घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारोडी, घोडेगाव, शिनोली, डिंभे, तळेघर, भीमाशंकर, आहुपे, बोरघर, अडिवरे, पाटण आदी गावांचा व वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना व प्रतिबंधक कारवाईवर भर देण्यात आला आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 217 गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 70 जणांवर चॅप्टर केस तर 5 जणांवर दोन वर्षांसाठी तडीपारी सुचविण्यात आली आहे. पंधरा दिवसांसाठी 10 व्यक्तींवर निवडणूक काळापुरती तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई दारुबंदी नियमांतर्गत 5 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. 125 गुन्हेगारांना निवडणूक काळात शांतता राखावी यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्र झोपडपट्टी कायदा अन्वये दोन गुन्हेगारांवर कारवाईचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.