राम मंदिर बांधकामासाठी रु. २१०० कोटीची देणगी

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली माहिती

अयोध्या – उत्तर प्रदेशातील अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर बांधकामासाठी २१०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची देणगी मिळाली आहे. ही रक्कम मंदिर बांधकामाला लागणाऱ्या अंदाजे खर्चापेक्षा दीडपट जास्त आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राम मंदिर परिसर बांधकामासाठी ११०० कोटी रुपये खर्चाचा अंदाज वर्तवला होता, तर मंदिर बांधकामासाठी ३०० ते ४०० कोटी रुपये खर्चाचा अंदाज हाता. ट्रस्ट या अंदाजाच्या सुमारे १००० कोटी रुपये जास्त रक्कम मिळाली आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांनी ही माहिती दिली.

विश्व हिंदू परिषदेने १५ जानेवारीपासून निधी समर्पण अभियान सुरू केले होते. ४४ दिवसांत उद्दिष्ट पूर्ण व्हायचे हाेते. ज्या राज्यांत अभियान उशिरा सुरू झाले तेथे वर्गणी गोळा केली जात आहे. यामुळे देणगी रक्कम आणखी वाढेल.दरम्यान, अयोध्येतील साधू-संतांनी जादा रकमेचा वापर अयोध्येच्या विकासासाठी करण्याचा सल्ला दिला आहे.

ट्रस्टचे दुसरे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, मंदिर परिसराच्या बांधकामाचे बजेट अंतिम नाही आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच ते लक्षात येईल. मिश्रा यांनी सांगितले की, दीड लाख गट या मोहिमेत होते. देणगी देताना धर्म, जात, संप्रदायाच्या भावना गळून पडल्या. सर्वांनी राम मंदिरासाठी देणगी दिली. यात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील लाेकही सहभागी आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.