दिल्लीत 21 वर्षीय युवतीवर पाच जणांचा बलात्कार

निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती

नॉयडा – दिल्लीत नॉयडा परिसरात एक 21 वर्षीय युवतीवर पाच जणांनी सामुहिक बलात्कार करण्याचा प्रकार घडला आहे. नॉयडाच्या सेक्‍टर 63 मध्ये ही घटना घडली. तेथे ही मुलगी एका परिचीत इसमाकडे नोकरीच्या संबंधात गेली होती, त्यावेळी पाच जणांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला. ज्या इसमाला ती भेटण्यासाठी गेली होती त्यानेही तिच्याशी गैरवर्तन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या इसमासह चार जणांना अटक केली आहे.

सदर मुलगी अशिक्षित आहे. ती नोकरीच्या शोधात होती. त्यासाठी ती आपल्या भावाशी परिचीत असलेल्या एका इसमाकडे नोकरी मागण्यासाठी गेली होती. त्याने तिला याच कामासाठी पार्क मध्ये बोलावले. त्यावेळी त्यानेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या पाच जणांच्या लक्षात आला त्यांनी या इसमाला तेथून मारहाण करून पिटाळून लावले आणि नंतर त्यांनीही या मुलीवर बलात्कार केला.

या पाचही जणांची ओळख पटली असून त्यातील तीन जणांना अटक करण्यात आली असून बाकीच्या दोघांचा शोध जारी आहे. या मुलीला तेथे बोलावणाऱ्या त्या इसमालाही अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले आरोपीही अल्पशिक्षित असून ते तेथील झोपडपट्टीत राहतात. आणि याच सेक्‍टरच्या परिसरात ते मजुर म्हणून काम करतात.

फरारी आरोपींना शोधून देण्यासाठी पोलिसांनी 25 हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.