नगर – प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड आणि चांगली प्रशासकीय कामगिरी करणाऱ्या 21 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात काला.
यावेळी मंदार मल्लिकार्जुन जवळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग), दिलीप शिशुपाल पवार (स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक), श्रीहरी रामचंद्र बहीरट (पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे), अरुण भागीरथ परदेशी (पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे), दौलतराव शिवराम जाधव (पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस ठाणे), संदीप भगवान पाटील (स्थानिक गुन्हे शाखा), पवन शंकर सुपनर (पो.उ.नि. एमआयडीसी पोलीस ठाणे, अ.नगर), पोहेकॉं मनोहर सीताराम गोसावी (स्थानिक गुन्हे शाखा), दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, पो.ना. रविंद्र आबासाहेब कर्डिले, पो.ना. संदीप कचरु पवार, जालिंदर काशिनाथ लोंढे (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), किशोर सुभाष जाधव (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), योगेश मनोहर गोसावी (सायबर पोलीस ठाणे), अभिजित दत्तात्रय आरकल (सायबर पोलीस ठाणे), राहुल नरसय्या गुंडू (सायबर पोलीस ठाणे), पो.ना. संदीप विक्रम चव्हाण (एमआयडीसी पोलीस ठाणे), पो.ना विजय विठ्ठल नवले (एमआयडीसी, पोलीस ठाणे), पो.कॉं रशिद बादशहा शेख (राहाता, पोलीस ठाणे), अजित अशोक पटारे (राहाता, पोलीस ठाणे), संतोष ज्ञानेश्वर बोळगे (श्रीगोंदा) आदिंचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहुल द्विवेदी, प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले आदीसंह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.