व्यावसायीकाच्या घरातून 21 लाखांचा ऐवज लांबविला

38 तोळे सोन्याचे दागिने, पाच किलो चांदी व तीन लाखांची रोकड चोरली

 

पुणे – वाकडेवाडीत एका व्यावसायिकाचे बंद घर चोरट्यांनी फोडले. येथून त्यांनी 38 तोळे सोन्याचे दागिने, पाच किलो चांदी व तीन लाखांची रोकड असा तब्बल 21 लाख 20 हजारांचा किंमती ऐवज चोरून नेला. ही घटना 15 ए भाले इस्टेट, गारवे होंडा शोरुमच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी प्रशांत मनोहर आभिनभावी (वय 50) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

फिर्यादी आभिनभावी हे व्यावसायिक आहेत. काही कामानिमित्त ते बाहेर गेले होते. त्यामुळे सोमवारपासून (दि.14) त्यांचे राहाते घर बंद होते. चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुमधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदी व रोकड असा 21 लाखांपेक्षा अधिक किंमतीचा ऐवज चोरला.

अभिनभावी जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता, चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्‍त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे निरीक्षक पठाण यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पठाण करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.