नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक 30 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील 21 शहरांचा समावेश आहे. गझियाबाद हे जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर ठरले असून 2019मध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या यंदा दिल्लीचा क्रमांक पाचवा लागला आहे.
जागतिक हवेच्या दर्जाच्या अहवलात ही बाब स्पष्ट झाली आहे. गझियाबादनंतर चीनमधील होतान शहर सर्वाधिक प्रदुषित ठरले आहे. गुजरनवाला आणि फैसलाबाद या पाकिस्तानातील शहरांचा त्यानंतर क्रमांक लागतो. त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो.
भारतातील प्रदुषित शहरे (अहवालातील अनुक्रमानुसार) गझियाबाद, दिल्ली, नोएडा, गुरगाव, ग्रेटर नोएडा, बंधवारी, लखनौ, बुलंदशहर, मुझफ्फरनगर, बागपत, जींद, फरिदाबाद, कोराऊत, भिवडी, पाटणा, पालवाल, मुझफ्फरपूर, हिसार, कुटैल, जोधपूर आणि मोरादाबाद अशी या शहरांची नावे आहेत.
सर्वाधिक प्रदुषित देशांत भारताचा क्रमांक पाचवा लागतो. सर्वाधिक प्रदुषित देश बांगलादेश ठरला आहे. त्यापाठोपाठ पाकिस्तान, मोंगोलिया आणि अफगाणस्तिानचा क्रमांक लागतो. मात्र भारतातील शहरांमधील हवेची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत सूधारली असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. हवेतील प्रदुषित घटकांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने 2.5 पीएम एवढे टरवले आहे. त्याच्या 500 पट अधिक आहे. मात्र राष्ट्रीय प्रदुषणाचे 20 टक्क्कयांनी कमी झाले आहे. 2.5 पीएममध्ये सल्फेट, नायट्रेट, आणि काळा कार्बनसारख्या घटकांचा समावेश आहे.
जग कोरोना व्हायरसला आव्हान म्हणून पहात आहे. मात्र हवेतील प्रदुषणाच्या स्लो पॉयझनिंगमुळे 70 लाख जण मरण पावतात., असे कजागतील हवेचा दर्जा संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रॅंक हाम्मेस म्हणाले.