मनपा विभाग व जिल्ह्यात रुग्ण संख्या पाच हजार 788 वर पोहोचली.
शिराळा (प्रतिनिधी) – सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात 3518 अशी एकूण रुग्ण संख्या झाली आहे. सांगली जिल्ह्यात शुक्रवारच्या अहवालानुसार 10 मृत्यू झाले आहेत. त्याचप्रमाणे 209 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज अखेर एकूण पॉझिटिव पैकी 3 हजार 70 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या पाच हजार 788 वर पोहोचली आहे. आज अखेर 201 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज उपचाराखाली 2 हजार 517 रुग्ण आहेत. शुक्रवारी 1हजार 279 टेस्ट घेण्यात आल्यापैकी 174 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 816 अॅटीजन टेस्ट पैकी 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या
आटपाडी 22, जत 8, कडेगाव 3, खानापूर3, मिरज 20, पलूस 14, शिराळा 14, सांगली 60, मिरज 23 असे आहेत.
शुक्रवारचे अहवालातील मृतांमध्ये तासगाव येथील 72 व 73 वर्षांची पुरुष, मिरज येथील 69 व 28 वर्षांची पुरुष. सांगली येथील 83 वर्षांचे पुरुष व 82 वर्षाची महिला व 61 वर्षांची महिला. नागज येथील 58 वर्षांची महिला असा समावेश आहे. आज 118 रुग्ण करोना मुक्त झाले. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दुप्पट रुग्णसंख्या मनपा विभागातील आहे. सुदैवाने त्यापैकी 3070 रुग्ण आज अखेर बरे झाले आहेत.
तालुकानिहाय अखेरची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आटपाडी 243. जत 220, कवठेमहांकाळ 198, कडेगाव 120, खानापूर 107, मिरज 476, पलूस 196, शिराळा 253, तासगाव 182, वाळवा 275, मनपा 3518 असे आहेत.