204 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

“बीपीएसएल’चे संजय सिघल यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंग विरोधी कारवाई

नवी दिल्ली : भूषण पॉवर ऍन्ड स्टील लिमिटेड (बीपीएसएल)चे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय सिंघल यांच्याशी संबंधित तब्बल 204 कोटींची मालमत्ता सक्‍त वसुली संचलनालयाने जप्त केली आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दिल्ली आणि लंडनमधील निवासस्थानांचाही समावेश आहे, असे “ईडी’ने म्हटले आहे.

संजय सिंघल यांनी “बीपीएसएल’च्या बॅंकेच्या कर्जातून 204.31 कोटींची रक्कम परस्पर वळती करून त्याचा विनियोग भारतात विदेशातील मालमत्ता खरेदीसाठी केला, असे “ईडी’ने म्हटले आहे. या संदर्भात “ईडी’ने शुक्रवारी सिंघल आणि इतर काही जणांच्या विरोधात “पीएमएलए’ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रामध्ये 24 जणांचा उल्लेख आरोपी म्हणून करण्यात आला आहे.

न्यायालयाने सिंघल यांच्याविरोधात 21 जानेवारीला न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी वॉरंटही बजावले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीने त्यांना अटक केल्यानंतर सिंघल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

या प्रकरणात एजन्सीकडून आतापर्यंत 4,229 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता ताब्यात घेतली गेली आहे. आरोपींविरोधात “सीबीआय’ ने दाखल केलेल्या “एफआयआर’च्या आधारे “ईडी’ने “पीएमएलए’ अंतर्गत खटला दाखल केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here