पुणे – ग्राहक पेठेच्या वतीने अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा तब्बल 20 हजार बिस्कीटे आणि चॉकलेट्सचा वापर करुन बिस्कीटांचे गणेश मंदिर साकारण्यात आले आहे. केवळ सजावटच नव्हे तर बिस्कीटांची गणेश मूर्ती देखील साकारण्यात आली आहे. टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेतर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो.
यंदा 18 हजार बिस्कीटे आणि 2 हजार 800 चॉकलेटस् वापरुन गणेश मंदिर साकारण्यात आले आहे. संपूर्ण मंदिर आणि प्रवेशद्वारावर बिस्कीटांचे नक्षीकाम केले आहे. तर बिस्कीटांचे पुडे वापरुन मंदिरातील स्तंभ बेहुब साकारण्यात आले आहेत. बिस्कीटांच्या मंदिरासोबतच प्रत्यक्ष गणेशाची मूर्ती देखील बिस्कीटांची करण्यात आली आहे. त्याकरीता 6 किलो छोटी बिस्कीटे व चॉकलेट्स वापरण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.