2019 ची निवडणूक भाजप आणि विरोधी आघाडीमध्येच होईल

संस्थांवरील नियोजनबद्ध हल्ल्याच्या आरोपाचा राहुल गांधी यांच्याकडून पुनरुच्चार
लंडन – पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका या प्रथमच भाजप आणि विरोधी आघाडीमध्ये होतील. भारतीय संस्थांवर नियोजनबद्ध हल्ला होत असल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्‍समध्ये भारतीय विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांबरोबरच्या वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि भारतीय संस्थांवरील हल्ले रोखण्यास कॉंग्रेसचे प्राधान्य असेल, असेही राहुल गांधी म्हणाले.

“पुढील निवडणूक थोडीशी आमने सामने होणार आहे. एका बाजूला भाजप असेल आणि दुसरीकडे प्रत्येक विरोधी पक्ष असेल. कारण भारतीय संस्थांवर होणारे हल्ले आम्हाला रोखायचे आहेत. विषाचा प्रसार रोखायला पाहिजे, हा मुद्दा मला आणि संपूर्ण विरोधकांना पटला आहे.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महत्वाची बाब म्हणजे आपण लोकशाहीची अंमलबजावणी करत आलो असून आपल्यावर सातत्याने हल्ला केला जात आला आहे. आपल्या विचारसरणीचे सार हे अहिंसा हेच आहे. हिंसाचारग्रस्त असल्यानेच आपण सर्व तऱ्हेच्या हिंसेचा निषेध करतो. त्याबाबत आपले विचार सुस्पष्ट आहेत. जे आपल्याला ओळखतात ते आपल्य दयाळू स्वभावाविषयी जाणतात, असेही राहुल गांधी म्हणाले.

देशात रोजगाराचा बोजवारा उडाला आहे आणि सरकार ही बाब अमान्य करत आहे. जेथे चीनमध्ये दिवसाला 50 हजार नोकऱ्या उपलब्ध होतात, तिथे भारतात मात्र दिवसाला केवळ 450 नोकऱ्या उपलब्ध होतात. ही एक भीषण आपत्ती आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात दडपशाहीची भावना
देशातील संस्थांवर नियोजनबद्ध हल्ले केले जात आहेत, असे विरोधकांमधील प्रत्येकाला वाटते आहे. देशातील प्रत्येक भारतीयावरील या दडपशाहीविरोधात कॉंग्रेस उभी ठाकली आहे. भारतीयांच्या दृष्टीकोनातून बघितले तर सर्व भारतीयांच्या त्यागातूनच विकास होतो आहे. त्याचा फायदाही भारतीयांनाच मिळणार आहे. कोणत्याही समुदायाला आपले म्हणणे ऐकले जात नाही, असे वाटायला नको, असे गांधी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)