2017 या वर्षात झालेल्या 822 जातीय दंगलीत 111 ठार

नवी दिल्ली – देशात सन 2017 या वर्षात एकूण 822 जातीय दंगली झाल्या त्यात एकूण 111 जणांना प्राण गमवावे लागले अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. यावेळी त्यांनी सन2016 आणि 2015 या वर्षातील दंगलींचाही तपशील दिला. ते म्हणाले की सन 2016 साली 703 दंगली देशभरात झाल्या होंत्या त्यात 86 जण मरण पावले तर 2015 साली झालेल्या 751 जातीय दंगलीत 97 जण ठार झाले होते अशीा माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की राज्यात जातीय सलोखा कायम राखणे आणि कायदा आणि सुव्यवस्था स्थिती नीट राखून दंगेखोरांना शासन करणे ही सर्वस्वी राज्य सरकारांची जबाबदारी आहे. राज्यांमधील जातीय सलोखा कायम राखण्यासाठी केंद्र सरकारही विविध प्रकारे राज्यांना सहाय्य करीत असते. त्यात गुप्तचर यंत्रणांना मिळालेली माहिती राज्य सरकारांपर्यंत पोहोचवणे. महत्वाच्या घडामोडींबाबत त्यांना सल्ला देणे अशी कामे केंद्र सरकारकडून केली जातात अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)