सांगली – सांगलीमध्ये 2008 साली झालेल्या दंगलीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांना न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह संशयित 90 आरोपी सुनावणीसाठी सांगली न्यायालयात हजर होते. या दंगलप्रकरणी एकूण 94 जणांवर गुन्हा दाखल आहे.
जोधा अकबर चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध आणि त्यांनतर पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्यामुळे सांगलीत तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. यावेळी सांगलीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. या दंगलीत एसटी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर 94 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासह तीन जणांविरोधातील अजामिनपात्र वॉरंट आज न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे.