नवी दिल्ली – स्विस बॅंकांमध्ये भारतीयांनी जमा केलेली रक्कम 20 हजार कोटींच्या पुढे गेली आहे. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बॅंकेने नुकतीच जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, सन 2020मध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांनी स्विस बॅंकांमध्ये सुमारे 20,700 कोटी रुपये जमा केले आहेत.
एकीकडे खासगी बॅंक खात्यात जमा केलेली रक्कम खाली आली असताना वित्तीय संस्था आणि कंपन्यांनी सिक्युरिटीज व इतर मार्गांनी बरीच रक्कम जमा केली आहे. स्विस नॅशनल बॅंक (एसएनबी) च्या आकडेवारीनुसार, 2019च्या अखेरीस भारतीयांच्या ठेवींची संख्या 6,625 कोटी इतकी आहे. सर्वाधिक 13 हजार 500 कोटी रुपये बॉंड, सुरक्षा ठेव व इतर माध्यमांद्वारे गुंतविण्यात आले.
बॅंकेच्या माहितीनुसार, यापुर्वी 2006 मध्ये भारतीय ठेवींनी 6.5 अब्ज स्विस फ्रॅंकची विक्रमी नोंद गाठली होती. परंतु त्यानंतर 2011, 2013 आणि 2017 वगळता भारतीयांनी स्विस बॅंकांमध्ये पैसे जमा करण्यात फारसा रस दाखविला नाही. परंतु 2020 ने जमा रक्कमेचा सर्व आकड्यांचे रेकॉर्ड मोडले. 2020 मध्ये जेथे खासगी ग्राहकांच्या खात्यात भारतीय ठेवींमध्ये सुमारे 4000 कोटी रुपये होते, तर इतर बॅंकांमार्फत 3100 कोटी रुपये जमा झाले.
तसेच सर्वाधिक 13 हजार 500 कोटी रुपये बॉंड, सुरक्षा ठेव व इतर माध्यमांद्वारे गुंतविण्यात आले आहेत. ही आकडेवारी अधिकृत असून काळ्या पैशाशी या आकडेवारीचा संबंध नसल्याचे बॅंकेने स्पष्ट केले आहे.