2 हजार करदात्यांचे “समाधान’

7 लाख 57 हजारांचा कर वसूल 

पुणे – महापालिका हद्दीत समाविष्ट 11 गावांमधील मिळकतधारकांना कर भरणे सुलभ व्हावे, तसेच कराबाबतच्या शंकांचे समाधान करण्यासाठी महापालिकेने “समाधान’ योजना सुरू केली आहे. यात सुमारे 2 हजार 75 नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांचे प्रश्‍न आणि शंकांचे समाधान कर संकलन विभागाने केले.

ही 11 गावे महापालिका हद्दीत समाविष्ट होऊन सुमारे दीड वर्षे झाले आहे. ग्रामपंचायतीकडील नोंदीनुसार या गावात सुमारे 1 लाख 21 हजार मिळकती असून त्यांना ग्रामपंचायतीची थकबाकी आणि महापालिकेचा नवीन कर आकारण्यात आला आहे. “मिळकतकर बिलात पथ, अग्निशमन, स्वच्छता, सफाई असे वेगवेगळे 8 ते 9 कर आकारण्यात आले आहेत. यामुळे यातील अनेक सुविधा मिळतच नाही. त्यामुळे आम्ही कर का भरायचा,’ असा प्रश्‍न हे नागरिक करत आहेत.

ही बाब लक्षात घेऊन या नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी तसेच त्यांना कर आकारणीची माहिती देण्यासाठी हे समाधान शिबिर घेण्यात आले. त्यात 1 हजार 69 मिळकतधारकांनी कर आकारणीसाठी, तर मिळकत नावात बदल करण्यासाठी 68 नागरिकांनी अर्ज केले. याशिवाय सुमारे 123 तक्रारी प्राप्त झाल्या असून यात 7 लाख 75 हजार 968 रुपयांचा मिळकतकरही थकबाकीदारांनी जमा केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.