मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का होता. अशात उद्धव ठाकरेंनी आपली पुढील रणनीतीचे संकेत दिलेले असताना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. चिन्ह आणि नाव देण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा धक्कादायक आरोप राऊत यांनी केला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यापासून संजय राऊत आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. अशात आज माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठे आरोप केले आहेत. ते म्हणाले,”ज्याप्रमाणे आमच्याकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण घेण्यात आले हे सत्य नाही.. न्याय नाही हा एक व्यवहार आणि व्यापार झाला आहे. आतापर्यंत यामध्ये तब्बल दोन हजार कोटींची मोठी लेनदेणं झाली आहे. हा माझा प्राथमिक अंदाज आहे. हा निर्णय विकत घेतलेला निर्णय आहे”. असा धक्कादायक आरोप संजय राऊत यांनी केला.
“जो नेता,जो मेहमान लोकांचा गट आमदार खरेदीसाठी पन्नास पन्नास कोटी,खासदार खरेदीसाठी शंभर कोटीची बोली लावतात, ते लोक पक्ष चिन्ह खरेदीसाठी कितीची बोली लावतील तुम्ही अंदाज लावा असं म्हणत माझी माहिती आहे दोन हजार कोटी” असा आरोप आईवेळी राऊत यांनी केला आहे.
#WATCH शिवसेना और उसका निशान (तीर-कमान) चिह्न छीना गया है और ऐसा करने के लिए इस मामले में अब तक 2,000 करोड़ रुपए की लेनदेन हुई है: उद्धव ठाकरे गुट के नेता व सांसद संजय राउत, मुंबई pic.twitter.com/6hyQHLjMZr
— ANI_HindiNews (@AHindinews) February 19, 2023
मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले.त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.