बागलान (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील बागलान भागात शुक्रवारी रात्री अफगाणिस्तानच्या सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये तालिबानच्या 20 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील तालिबान नियुक्त जिल्हा गव्हर्नर अम्रुल्ला याचाही समावेश आहे.
याशिवाय अफगाण सुरक्षा दलातील 8 सैनिकही तालिबानींच्या हल्ल्यात ठार झाले. बगलान मधील गुजार-ए-नूर जिल्ह्यातील चौकीवर तालिबान्यांनी हल्ला केला तेंव्हा ही चकमक झाली.
अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी शुक्रवारी रात्री बझलिनमधील गुजार-ए-नूर, जुल्गा आणि बगलान-ए-जदिद जिल्ह्यांमध्ये तालिबानींवर हवाई हल्ले देखील केले होते. त्यामध्ये हे 20 दहशतवादी ठार झाले, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या 24 तासात 8 प्रांतांमध्ये किमान 92 तालिबानी दहशतवादी ठार आणि 48 इतर जखमी झाले, असे शनिवारी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाण राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणेने लघमान, मैदान वार्डक, सर-ए-पुल, लोगर, बलख, हेलमंद, बगलान आणि तखर प्रांतांमध्ये हल्ले केले, असे संरक्षण मंत्रालयाचे उप प्रवक्ते फवाद अमन म्हणाले. तालिबान्यांना सरकारी दलाच्या जबाबाचा सामना करावा लागला आणि या गटाचे बरेच सदस्य ठार झाले, असेही अमन म्हणाले.