आंध्र प्रदेश- मोहरमनिमित्त कर्नुल जिल्ह्यातील के बी थंड्रापुडु गावात यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रे दरम्यान, एका घराच्या छतावर काही नागरिक उभे होते. यावेळी घराचा काही भाग ढासळला. आणि ढिगाऱ्याखाली दबून 20 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
#WATCH Andhra Pradesh: Portion of a terrace collapsed during a Muharram procession, in B.thandrapadu village of Kurnool district, late last night. 20 people injured. They were later taken to a hospital for treatment. pic.twitter.com/k2tPpsouCC
— ANI (@ANI) September 10, 2019
यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची धावपळ सुरु झाली. जखमींना तात्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.