अजून एक गोंधळ! ‘ससून’ने पाठवलेल्या 35 पैकी 20 व्हेंटिलेटर नादुरुस्त

पुणे – ससून रुग्णालयातून कोविड जम्बो रुग्णालयाला देण्यात आलेल्या 35 पैकी 20 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याने ते परत पाठवण्यात आले. उरलेले 15 व्हेंटिलेटर अण्णासाहेब मगर स्टेडियममधील जम्बो कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

ससून रुग्णालयातील कोविड सेंटरच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील करोना रुग्ण सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहेत.

 

त्यामुळे तेथे देण्यात आलेले 35 व्हेंटिलेटर जम्बो कोविड रुग्णालयात देण्यात आले. मात्र त्यातील 20 मशिन बंद होत्या. ससून रुग्णालयाने न तपासताच हे सगळे व्हेंटिलेटर दिले.

 

वास्तविक त्यावेळी व्हेंटिलेटरची नितांत आवश्यकता असताना असे बंद पडलेले व्हेंटिलेटर देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.