अवघ्या चार वर्षांत नवीन खरेदी : स्थायीमध्ये आयत्यावेळी मंजुरी
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरांसाठी नवीन वाहन खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 लाख रुपयांची अलिशान गाडी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चार वर्षापूर्वीची महापौरांसाठी नवीन वाहन घेण्यात आले होते.
महापौर नितीन काळजे यांच्या कार्यकाळात म्हणजेच 2017 साली महापौरांसाठी नवीन वाहनाची खरेदी करण्यात आली होती. मात्र अवघ्या चार वर्षांत पुन्हा महापौरांसाठी नवीन वाहनाची खरेदी करण्यात येणार आहे.
महापौरांसाठी अलिशान वाहनाची थेट पद्धतीने खऱेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी टोयाटो किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून थेट पद्धतीने 20 लाख रुपयांचे वाहन खरेदी करण्यात येणार आहे.
या वाहन खरेदीसाठी आयत्यावेळी स्थायी समितीमध्ये सदस्यांनी प्रस्ताव ठेवला. त्याला स्थायी समिती सभापतींनी मंजुरी दिली.