वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील वडगाव-खडकाळा गटातील सहा गावातील “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र’ “ब’मध्ये 20 लाभार्थी पात्र असून, जागे अभावी त्यांची घरकुलांची कामे होऊ शकली नाही, त्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य गुलाब म्हाळसकर यांनी केले आहे .
जर शासकीय जागा उपलब्ध होत नसेल तर बक्षीस पत्र करून देणाऱ्यांची नावे काळवावीत, असे आवाहन म्हाळसकर यांनी केले. प्रधानमंत्री आवास योजनेतील “ग्रामीण प्रपत्र “ब’ पात्र असलेल्या तालुक्यातील वडगाव- खडकाळा गटातील खडकाळा येथील 3, कान्हे व कुसगाव येथील प्रत्येकी 6 व चिखलसे येथील 5 अशा एकूण 20 लाभार्थ्यांना जागा नसल्याने घरकुलांचा लाभ देता आला नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थी पात्र असूनही या योजनेपासून ते दूर राहिले आहेत.