पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी देहूगाव येथे संत श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यानंतर पंतप्रधानांची सभा होणार आहे. पण, सभास्थळ ते वाहनपार्किंग हे अंतर साधारण दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे नागरिकांना सभास्थळी जाण्यासाठी पीएमपीने 20 ई-बसेस सोडण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या हस्ते देहू गावातील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम आटोपल्यावर पंतप्रधानांची देहू येथील माळवाडी येथे सभा होणार आहे. पण, सभा स्थळ ते पार्किंग दूर असल्याने नागरिकांना पीएमपीचा आधार घ्यावा लागणार आहे.