शिरूर – शिरूर शहरासह तालुक्यात शनिवारी (दि. 1) 15 गावात 20 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील कोविड केअर सेंटर मधून 32 जणांची तपासणी करण्यात आली होती, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.
शिरूर शहरात 2 तर तालुक्यात 18 करोना बाधित रुग्ण आढळले आहे. तर शिरूर ग्रामीण रामलिंग रोड वरील एका 65 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शिरूर शहरातील विठ्ठलनगर येथील 29 वर्षीय पुरुष तर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील काम करणारा एक काची आळी येथील 32 वर्षीय पुरुष असे दोघेजण शिरूर शहरात करोना बाधित आढळले असून शिरूर शहरातील 15 जणांची करोना तपासणी करण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यातील विविध गावातील 17 जणांची करोना तपासणीकरिता नमुने घेण्यात आले आहे. तर शिरूर तालुक्यातील शिरूर शहरात 2, शिक्रापूर 3, सणसवाडी 1, पारोडी 1, निमगाव म्हाळुंगी 1, शिरूर ग्रामीण 2, करंजावणे 1, तर्डोबावाडी 1, पिंपळे धुमाळ 1, कोरेगाव भीमा 1, जांबुत 1, करंदी 1, आपटी 1, सादलगाव 2, रांजणगाव गणपती 1 असे शिरूर तालुक्यातील पंधरा गावात 20 करोना बाधित रुग्ण आढळले आहे.