20 वर्षांनी केले स्नान

सार्वजनिक स्वच्छतेबाबत युरोपियन लोकांच्या तुलनेत आपण कुठे आहोत, हे काही सांगण्याची गरज नाही. कुठल्याही शहराचे चौक, सार्वजनिक इमारतींचे कोपरे, गल्ल्या याची साक्ष देऊ शकतात. आपल्याकडे मुळात सरकारी इमारती, कार्यालये इथेच स्वच्छतेची वानवा असते. सरकारी शाळांमधील सुविधा आणि यंत्रणा यांना तर स्वच्छतेची ऍलर्जी असते की काय असा प्रश्‍न विचारला जातो.

यातील गंमत म्हणजे सार्वजनिक स्वच्छतेमध्ये आपल्यापेक्षा कैकटींनी युरोपियन आणि पाश्‍चिमात्य राष्ट्रे आघाडीवर असली तरी वैयक्तिक स्वच्छतेबाबत मात्र आपण युरोपियन लोकांपेक्षा पुष्कळ बरे म्हणता येईल. आपल्याकडे त्रिकाळ स्नानाचीही परंपरा आहे! ही परंपरा पाळली जात नसली तरी दिवसातून एकदा तरी आपण आंघोळ करतो. मात्र युरोपियन देशांमध्ये थंडीमुळे तिथे आंघोळ आठवड्याच्या कोष्टकात बसवलेली असते, शिवाय अन्यही अनेक गोष्टी आपल्याला किळसवाण्या वाटू शकतात. इंग्लंडमधील एका माणसाने तर तब्बल वीस वर्षांनी आंघोळ केली.

इतकी वर्षे आंघोळ न करण्यामागे त्याचे अगडबंब वजन हे कारण होते.3 7 वर्षांच्या चार्ल्स पास्क याचे वजन 212 किलो होते. अखेर त्याने पंधरा महिने परिश्रम घेऊन सुमारे 90 किलो वजन घटवले. कंबरेचे मापही 28 इंचाने घटवले. वजन अधिक असताना त्याला आपली दैनंदिन कामे नीट करता येत नव्हती.

मात्र, त्याच्या एका मित्राचा कर्करोगाने मृत्यू झाल्यावर तो आपल्या आरोग्याबाबत सजग झाला. त्याने वजन कमी करण्याचे ठरवले आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केला. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि तो बराच फिट झाला आहे. मात्र, पूर्वी तो बाथटबमध्ये बसू शकत नव्हता. त्यामुळे त्याने वीस वर्षे आंघोळीलाही सुट्टी दिली होती. वजन कमी केल्यानंतर त्याने बाथटबमध्ये बसून अंग यथेच्छ बुचकळून घेतले!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)