पालघर – महावितरण अंतर्गत तक्रारींवरून कोणतीही कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेताना महावितरण विभागाच्या महिला अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली आहे. किरण हरीश नागावकर (वय 45), प्रताप हरचंद मचिये (वय 50) यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्यावर महावितरण अंतर्गत दोन ते तीन तक्रारी दाखल होत्या. त्यावरून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी या दोघांनीही दोन लाख रुपये लाच मागितली. परंतु तक्रारदार यांनी लाचेची रक्कम जास्त असल्याचे सांगत तडजोडी नंतर दीड लाख करण्यात आली. याबाबत 37 वर्षीय तक्रारदार यांनी पालघर एसीबीकडे बुधवारी (दि.21) तक्रार केली आहे.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा, पडताळणी करून महावितरण कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ठरलेल्या रकमेपैकी एक लाख रुपये लाच घेताना प्रताप मचिए यांना त्यांच्या कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. यानंतर किरण नागावकर यांना ताब्यात घेण्यात आले. ही करवाई पालघर एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.26) प्रताप मचिए यांच्या कार्यालयात केली. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे.