शिरूर : शिरूर शहरातील आदिनाथ नगर येथे 61 वर्षीय वृद्ध व बी जे कॉर्नर येथे कमल हाईटस येथे 50 वर्षीय शिक्षक असे दोन ठिकाणी कोरोना बाधित आढळले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे.
शिरूर शहरात खळबळ उडाली असली तरी नागरिक व शिरूर नगरपरिषद याबाबत मात्र गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये एका मेडिकल व्यावसायिकाच्या वडिलांचा व एका शिक्षकांचा समावेश असून आदिनाथ नगर येथील वृद्धास पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले असून कमल हाईटस येथील 50 वर्षीय शिक्षकाला त्याच्या घरामध्येच इंसुलेशन केले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले आहे.
शिरूर शहरात आज सापडलेले हे दोन्ही रुग्ण यांनी आपली कोरोना चाचणी खाजगी लॅबमध्ये केली असून लवकर नगरपरिषद किंवा आरोग्य विभागाला याबाबत माहिती देत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शिरूर शहरात आदिनाथ नगर येथे सापडलेला 61 वर्षीय रुग्णाचा अहवाल काल सायंकाळी 6 वाजता आला असून, त्याच्या संपर्कातील १२ क्वारंटाइन जण करण्यात आले आहेत. या रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल येऊन 12 तास झाले तरी प्रशासनाला सांगून ही याबाबत प्रशासन आणि खबरदारी घेतली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यातील शिक्षक असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे अनेक दिवसापासून घरीच बसले असून केवळ दूध आणण्यासाठी शिरूर शहरात व त्यांच्या मळ्यात जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले. त्यांच्या घरातील त्यांची पत्नी मुलगा मुलगी यासह सहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
रुग्ण सापडून अनेक तास झाले असले तरी याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नसल्याच्या शिरूर शहरातील नागरिकांचे म्हणणे असून प्रशासनाने याबाबत जागृत राहणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शिरूर शहरात लॉकडाऊन व दुकाने उघडण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत परंतु याबाबत शिरूर नगर परिषद गंभीर कधी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोशल डिस्टन्स, मास्क न वापरणे, कोणतीही खबरदारी शहरातील नागरिक घेत नसल्याचे दिसून येत आहे.
शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख , तहसीलदार लैला शेख यांनी शिरूर शहरात लक्ष घालून, व्यापारी दृष्टिकोन बाजूला ठेवून नागरिकांच्या आरोग्यासाठी नियमावलीची अंमलबजावणी व्हावी यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.