अभिनेता हृतिक रोशन ‘या’ लोकांना केली २५ लाखांची मदत

मुंबई : सध्या देशात कोरोनाचे संकट ओढवले आहे. दरम्यान, देशातील प्रत्येकजण आपापल्या परीने एकमेकांना मदत करत आहे. त्यातच अभिनेता हृतिक रोशन  हा देखील मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने चित्रपट आणि मालिकेच्या सेटवर रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी २५ लाखांची मदत देऊ केली आहे. हृतिकने  सिंटा (सिने अँड टिव्ही आर्टिस्ट असोशिएशन) कडे ही मदत देऊ केली आहे. या मदतीमुळे सिंटाच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या ४ हजार कामगारांना आर्थिक मदत मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी KWAN या हृतिकच्या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीनं रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तींच्या बँक खात्याचे क्रमांक मागितले होते, हे क्रमांक मिळाल्यानंतर सिने आर्टिस्ट वेल्फेअर ट्रस्टकडे २५ लाखांचा निधी देण्यात आला, अशी माहिती सिंटाच्या अमित बेहल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिली आहे.

त्याचप्रमाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मास्कची मदतही हृतिककडून केली जाणार आहे. त्याचप्रमाणे काही संस्थेच्या मदतीने हृतिक गरजू, वृद्धाश्रम आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना देखील आर्थिक सहाय्य पुरवणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.