भारताचे 2 लाख 2 हजार विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी दाखल

चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक

वॉशिंग्टन: सन 2018-19 या वर्षात भारतातील 2 लाख 2 हजार विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी दाखल झाले आहेत. अमेरिकेत शिक्षणासाठी विद्यार्थी पाठवण्यात चीनचा पहिला क्रमांक आहे. त्या पाठोपाठ भारताचा क्रमांक लागला लागला आहे. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय शिक्षण या विषयातील अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. सन 2018-19 या वर्षात अमेरिकेने विदेशातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी प्रवेश दिला आहे. एकूण दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी या वर्षात तेथे शिक्षणासाठी म्हणून दाखल झाले आहेत.

या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी आणि अन्य योगदानाद्वारे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत 44.7 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यातील आर्थिक वाढ ही 5.5 टक्के इतकी आहे. अमेरिकेत विद्यार्थी पाठवण्याच्या बाबतीत गेली दहा वर्ष चीन सतत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. 2018-19 या वर्षात चीनचे 369548 इतके विद्यार्थी अमेरिकेत दाखल झाले आहेत. अमेरिकेत सध्या एकूण 10 लाख 95 हजार 299 आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिकत आहेत. यातील निम्मे विद्यार्थी केवळ चीन आणि भारतातील आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.