मुंबई – मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने जुहूमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये एका प्रसिद्ध मॉडेल व प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा समावेश आहे. जुहूमधील एका हॉटेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ईशा खान असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव असून ती गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई शहरातील मोठ्या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.
पोलिसांना एक पथक तयार करून ईशा खानवर पाळत ठेवली. सुरुवातीला बनावट ग्राहक बनून पोलिसांनी तिच्याशी संपर्क केला. त्यानंतर तिने तरुणींचे अनेक फोटो पोलिसांना पाठविले असता त्यामध्ये प्रसिद्ध मॉडेल व प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा समावेश असल्याचे पोलिसांना दिसून आले.
ईशा खान ग्राहकांकडून एका तरुणीसांठी तासाला तब्बल दोन लाख रुपये घेत असल्याचे उघड झाले. त्यामधिल 50 हजार हे तिच्याकडे ठेवत असे तर दीड लाख रुपये तरुणीला देत असे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे हातात काम नसल्याकारणाने आपण या व्यवसायात आले असल्याचे पोलिसांना मॉडेल आणि अभिनेत्रीने सांगितले आहे.