नवी दिल्ली – भारत सरकारच्या डीआरडीओ या संस्थेने बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज ( 2- डीजी) च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
या औषधाचे अत्यंत वेगात उत्पादन करता येईल असे डीआरडिओनेही म्हटले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
करोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारपद्धती ऐवजी 2 डीजीचा वापर पर्यायी उपचार पद्धती म्हणून केला जाईल. या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे.
या औषधाच्या चाचण्या केल्या गेल्या तेव्हा याचा डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये याची सकारात्मक लक्षण दिसून आली आहेत. रुग्णांचा बरा होण्याचा वेग चांगला असून ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होते, असे सांगण्यात आले आहे.
ज्या रुग्णांना हे औषध दिले गेले ते वेगाने बरे होत असल्याचे आढळून आले असून त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे.
डीआरडीओने विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरूपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावे लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचचे काम करते. त्यासोबतच रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचेही काम करते असा दावा करण्यात आला आहे.
#WATCH: Dr Anant Narayan Bhatt & Dr Sudhir Chandna, Institute of Nuclear Medicine & Allied Sciences(INMAS-DRDO) scientists speak about drug 2-deoxy-D-glucose (2-DG). DCGI approved emergency use of its therapeutic application as adjunct therapy in moderate to severe COVID patients pic.twitter.com/pySgG2moQC
— ANI (@ANI) May 8, 2021