परभणी – वडापावच्या गाडीत ठेवलेल्या दोन सिलिंडरचा दहा मिनिटांच्या अंतराने स्फोट झाल्याने वसमत रोड हादरले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.
या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डींगसमोर मातोश्री वडापाव नावाचा स्टॉल आहे. नेहमीप्रमाणे वडापाव व्यावसायिकानेरात्री स्टॉल बंद केला. मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास स्टॉलला अचानक आग लागली.
या आगीत हातगाडीमधील एकासिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच आणखी एका सिलिंडरचा स्फोट झाला. एकामागोमाग झालेल्या दोन स्फोटांनी वसमतरोड परिसर हादरला. अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.