श्रीनगर : सियाचेन पर्वत रांगात झालेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. ते सियाचेन पर्वतांमध्ये 18 हजार फुटांवर गस्त घालत असताना ही दूर्घटना घडली.
आज पहाटे भारतीय लष्कराचे पथक गस्त घालत असताना हे हिमस्खलन झाले. त्यानंतर तातडीने हिमस्खलन मदत पथक पाठवण्यात आले. त्या पाठोपाठ दुसरे गस्त पथक पाठवण्यात आले. त्यांनी या पथकातील सर्व सदस्यांना शोधून काढले. या जवानांना हेलिकॉप्टरने वैद्यकीय सुविधा केंद्रात हलवण्यात आले.
लष्कराच्या वैद्यकीय पथकाने अथक प्रयत्न करूनही दोन जवानांचे प्राणोत्क्रमण झाले.
सियाचेनमध्ये 18 नोव्हेंबरला चार जवान आणि दोन हमालांचा मृत्यू झाला होता.