कराची – मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. हा देशातील सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात तब्बल 257 जणांचा मृत्यू, तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉंटेड आरोपी सलीम गाझी याचा मृत्यू झाला आहे.
रिपोर्टसनुसार, शनिवारी पाकिस्तानमधील कराचीमध्ये सलीम गाझी याचा मृत्यू झाला आहे. याबाबतचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
1993च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉंटेड आरोपी सलीम गाझी हा दाऊद टोळीचा सदस्य होता.
सलीम गाझी छोटा शकीलचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जायचा. मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून सलीम गाझी आजारी होता. त्याला हाय ब्लडप्रेशरसह अन्य आजारही होते. रिपोर्टसनुसार, शनिवारी कराचीमध्ये सलीम गाझी याचा हार्टऍटकने मृत्यू झाला.