नवी दिल्ली : करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस देशभरात अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 49 जणांचा करोनाने बळी घेतला असून, 1 हजार 990 नवे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशातील करोनाबाधितांचा संख्या 26 हजार 496 वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण करोनाबाधित 26 हजार 496 रुग्ण संख्येत सध्या उपचार सुरू असलेल्या 19 हजार 868 रुग्णांसह आतापर्यंत रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेल्या 5 हजार 804 जणांचा व मृत्यू झालेल्या 824 जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे.
There has been a spike of 1990 new COVID19 positive cases & 49 deaths in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare https://t.co/8N2QhXDY96
— ANI (@ANI) April 26, 2020
जगभरात सर्वत्र फैलाव झालेल्या जीवघेण्या करोना व्हायरसने जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत अक्षरशा थैमान घातले आहे. मागील चोवीस तासांत अमेरिकेत तब्बल 2 हजार 494 जाणांचा करोनाने बळी घेतला आहे.
यामुळे अमेरिकेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या संख्या आता एकूण 53 हजार 511 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत तब्बल नऊ लाख 36 हजार 293 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.