1984 च्या दंगलीला कॉंग्रेसचा कधीच पाठिंबा नव्हता

राहुल गांधी यांच्या वक्‍तव्यावरील टीकेनंतर कॉंग्रेसकडून स्पष्टिकरण

नवी दिल्ली: राहुल गांधी यांना खोटे ठरवण्याच्या प्रयत्नांमुळे सत्य बदलणार नाही. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी 1984 च्या शीख विरोधी दंगलीच्या विषयाला विरोधकांनी चिथावणी देऊ नये, असे कॉंग्रेस प्रवक्‍ते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शीखांविरोधात 1984 साली झालेल्या दंगलीमागे कॉंग्रेसचा हात नव्हता, असे मत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच लंडनमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यक्‍त केले होते. त्यावर शिरोमणी अकाली दलाकडून टीका व्हायला लागली होती. राहुल गांधी यांनी शीखांच्या जखमांवर मीठ चोळले असल्याची टीका अकाली दलाने केली. त्यावर मनु सिंघवी यांनी स्पष्टिकरण दिले आहे. या दंगलीनंतर कॉंग्रेसने केलेल्या उपाय योजनांबाबतची माहिती त्यांनी दिली. राजकीय हेतूने या जुन्या विषयाला विरोधकांकडून चिथावणी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“कॉंग्रेस पक्षाने यापूर्वी हजारदा या घटनेचा निषेध केला आहे. ही दंगल सर्वात दुर्दैवी होती, अशा शब्दामध्ये निषेध केला गेला आहे. या दंगलीला कॉंग्रेसचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही पाठिंबा नव्हता. तत्कालिन पंतप्रधानांनीही याप्रकर्णी माफी मागितली आहे.’ असे सिंघवी म्हणाले.

या दंगलीतील कथित सहभागाच्या आरोपांमुळे अनेक ज्येष्ठ नेत्यांचे राजकीय करिअर धोक्‍यात आले. मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे खटले चालले. काही दोषी आढळले. काहींवरील खटले प्रलंबित आहेत. मात्र त्यामध्ये कॉंग्रेसने कधीही हस्तक्षेप केलेला नाही, असे सिंघवी यांनी सांगितले. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलींनंतर तत्कालिन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काय उपाय योजना केल्या हा प्रश्‍न अकाली दलाने उपस्थित करायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)