7 राज्यांतील 193 जागा महत्त्वाच्या

– अंजली महाजन

2014 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान उत्तर प्रदेशाखेरीज हिंदी भाषिक पट्ट्यातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, बिहार, झारखंडसह गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधील एकूण 193 जागांपैकी 172 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या होत्या. यापैकी 145 जागा एकट्या भाजपानेच जिंकल्या होत्या. कॉंग्रेसला सात आणि यूपीएला 15 जागांवर विजय मिळाला होता. गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यात भाजपाने कॉंग्रेसला क्‍लीन स्वीप दिला होता.

मध्य प्रदेशात कॉंग्रेसला दोन, छत्तीसगडमध्ये एक, बिहारमध्ये दोन आणि महाराष्ट्रात दोन जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 23 जागांवर भाजपा आणि 18 जागांवर शिवसेनेला विजय मिळाला होता. चार जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. तथापि, आता बिहारमध्ये गतवेळच्या निवडणुकांमध्ये दोन जागा जिंकणारी जदयू ही यंदा भाजपासोबत आहे. तर तीन जागा जिंकणारी रालोसपा ही भाजपापासून वेगळी झाली आहे. दुसरीकडे गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांतील भाजपाची सत्ता कॉंग्रेसने हिसकावून घेतली आहे. त्यामुळे या राज्यांमधील निकालांवर संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. किंबहुना तेच निकाल निर्णायक ठरणार आहेत. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपाला कॉंग्रेसने चांगलेच झुंजवले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)