नागपूर : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेवर निर्बंध लादल्यानंतर सर्व व्यवहारांवर बंधने आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना केवळ 50 हजार रुपये काढता येणार आहेत. याचा फटका राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला बसण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाचे कित्येत कोटी रुपये या बॅंकेत अडकले आहेत. विद्यापीठाच्या येस बॅंकेमध्ये 191 कोटींच्या ठेवी असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीयीकृत बॅंकांचा पर्याय असताना खासगी बॅंकेत इतक्या ठेवी ठेवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात सिनेटची नुकतीच बैठक झाली.
दरम्यान राष्ट्रीयीकृत बॅंकेत विद्यापीठाने पैसा का ठेवला नाही, असा सवाल ऍड. मनमोहन वाजपेयी यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, येस बॅंकेत जगन्नाथ मंदिराचे 595 कोटी रुपये अडकले आहेत. त्यामध्ये 545 कोटी रूपये ठेवी ठेवल्या आहेत. त्यामुळे हे पैसेही अडकले आहेत. यामुळे मंदिर पुजारी आणि भक्त चिंतेत आहेत.
शुक्रवारी ओडिशा सरकारच्या नेत्यांनी मंदिरासंबंधीतच्या ठेवीबाबत दुजोरा दिला आहे. त्यानंतर विरोधीने यासंदर्भात ओडिशा सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे.