पिरंगुट – मुळशी तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) 19 जणांना करोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण करोना बाधितांची संख्या 734 तर मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे.
हिंजवडीमध्ये 10, कासारसाईमध्ये 5, रिहेमध्ये 2 , माणमध्ये 1, कासारआंबोली 1 असे 19 रुग्ण आढळले आहे. 136 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. 575 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज 17 रुग्ण घरी परतले आहे.