यवतमाळमध्ये दिवसभरात 19 नवे रुग्ण

यवतमाळ : यवतमाळमध्ये करोनाचा विळखा वाढत असून आज दिवसभरात करोनाचे 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही 79 वर पोहोचली आहे.
गेल्या तीन दिवसांत यवतमाळमधील करोना रुग्णांमध्ये 55नी वाढ झाली आहे. हा आकडा प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे.

शहरात रुग्णांची संख्या वाढतच आहे. रविवारी 60 पर्यंत असलेला हा आकडा आज 79 वर पोहोचला. रविवारी मध्यरात्रीनंतर 5 जणांचे, सोमवारी सकाळी 6 जणांचे तर संध्याकाळपर्यंत 8 जण असे एकूण संपूर्ण दिवसभरात 19 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर आयसोलेशन वॉर्डात एकूण 305 जण भरती आहेत. आयसोलेशन वॉर्डात आज तीन जण नव्याने भरती झाले आहेत. नागपूरला तपासणीकरिता पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 32 असून सद्यस्थितीत 102 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.