“नागवडे’ कारखान्याकडून ऊसबिलापोटी 19 कोटी वर्ग ः नागवडे

26 मेगा वॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण
श्रीगोंदा –
“नागवडे’ कारखान्याने सन 2018-19 च्या गळीत हंगामातील ऊसाच्या बिलापोटी प्रतिटन 255 रुपये 23 पैसे दराने एकूण 18 कोटी 75 लाख 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 31 मे रोजी वर्ग करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. कारखान्याने हाती घेतलेल्या 26 मेगा वॅट क्षमतेच्या सह वीज निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वीत होईल असे ही त्यांनी सांगितले.

मागील वर्षी तालुक्‍यात पाऊस अत्यंत कमी झाला होता. परंतु तरीही चांगले ऊस उत्पादन झाले होते.”नागवडे’ कारखान्याने 123 हंगाम चालवून 6 लाख 35 हजार 116 मेट्‍र्÷िऱ्÷ऱ्÷ऱ्÷र्रक टन उसाचे गाळप केले. प्रतिदिन सरासरी 5 हजार 316 मेट्रिक टन उसाचे गाळप करताना सरासरी 11.38 टक्के साखर उतारा राखला होता. या हंगामातील कारखान्याची एफआरपी दर प्रतिटन 2 हजार 495 रुपये 23 पैसे होती. कारखान्याने प्रतिटन 2 हजार 515 रुपये दर जाहीर केला होता असे सांगून नागवडे म्हणाले की, कारखान्याने या हंगामातील ऊस दरापोटी पहिला हप्ता प्रतिटन 2 हजार 200 रुपये दराने अदा केला होता.

आता एफआरपी ऊस दरातील उर्वरित 295.23 प्रतिटन दराने एकूण 18 कोटी 75 लाख 6 हजार रुपये ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यावर 31 मे रोजी वर्ग करण्यात येणार आहेत. कारखान्याचे संस्थापक व राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे यांचे कारखाना कार्यस्थळावर यथोचित स्मारक उभारण्याचा निर्णय सभासदांनी मागील वार्षिक सभेत एकमुखाने घेतला होता.

स्मारक उभारणीसाठी प्रतिटन पंधरा रुपये प्रमाणे कपात करण्यात येणार आहे. कारखान्याने स्व.बापूंच्या मार्गदर्शनाखाली 26 मेगा वॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी सुरू केली होती. सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी हे बापूंचे स्वप्न होते. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.लवकरच सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वीत होईल. ज्यामुळे ऊस दराच्या स्पर्धेत कारखाना तग धरु शकेल व ऊस उत्पादकांना जास्तीचा दर देणे शक्‍य होईल अशी ग्वाही नागवडे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here