हिमाचलमध्ये पावसामुळे आतापर्यंत 187 जणांचा मृत्यू तर, तेलंगणात 18 ठार

नवी दिल्ली – यंदाच्या पावसाळ्यात अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. हिमाचल प्रदेशात आतापर्यंत 187 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याच वेळी तेलंगणामध्ये एका आठवड्यात 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील सुमारे 12,000 लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील एका गावात शनिवारी ढगफुटी झाली. त्यामुळे सात घरे, एक मशीद आणि दोन शाळांचे नुकसान झाले. उधमपूरमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे नाल्यावरील फूटब्रिज तुटला आहे.
दिल्ली, पंजाब, हिमाचल आणि चंदीगड या उत्तर भारतीय राज्यांपाठोपाठ पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 6 राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 29, 30 आणि 31 जुलै रोजी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.





