दिल्ली : येस बॅंकेच्या ग्राहकांना मोठ्या संकटाची कुणकुण आधीच लागली होती आणि त्यातूनच त्यांनी मागील वर्षीच्या मार्च ते सप्टेंबर या कालावधीत तब्बल 18,110 कोटी रुपये आपल्या बॅंक खात्यातून काढून घेतले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
बॅंकेत काहीतरी गडबड सुरू आहे याची कुणकुण ग्राहकांना आधीच लागली होती हे यावरून स्पष्ट होत आहे. बॅंकेत सर्व आलबेल नसल्याचे लक्षात आले होते, त्यामुळे पूर्वीच मोठी रक्कम बॅंकेतून काढली, असे दिल्ली येथील एका ग्राहकाने सांगितले. आता बॅंकेत आमची फारशी शिल्लक नसल्याने चिंता करण्याचे कारण नाही, असे मत अन्य एका ग्राहकाने व्यक्त केले.
दरम्यान, येस बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेनेनिर्बंध लादले आहेत. यादरम्यान ग्राहकांना 50 हजारापर्यंतच रक्कम काढता येणार आहे.