म्यानमारच्या हिंसाचारात आतापर्यंत 18 जण ठार

यान्गोन – म्यानमारमधील नागरिकांनी सुरू केलेले जनआंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी रविवारी आंदोलकांवर गोळीबार केला आणि सामूहिक अटकसत्रही केले. या कारवाई दरम्यान 18 जण ठार झाले आणि 30 जणांना ताब्यात घेतले गेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असल्याचे संयुक्‍त राष्ट्राच्या मानवी हक्क पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यान्गोन, दावेई, मंडाले, म्येईक, बागो आणि पोकोक्कू या ठिकाणी आंदोलकांवर गोळीबार झाला असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा रक्षकांनी अश्रुधूर, मोठा आवाज करणारे ग्रेनेड्‌स आणि स्टॅन ग्रेनेडचाही वापर केला, असेही संयुक्‍त राष्ट्राच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. आंदोलकांविरोधातील ही कारवाई निषेधार्ह आहे. लष्कराने बळाचा वापर करणे लष्कराने ताबडतोब थांबवावे असे आवाहनही रविना शमदासनी या पदाधिकारी महिलेने केले आहे.

या आंदोलनाचे वार्तांकन केल्याबद्दल एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराला शनिवारी ताब्यात घेतले गेले आहे. हा पत्रकार अजूनही पोलिसांच्या कोठडीतच आहे. म्यानमारमधील 9 शहरांमध्ये काल संध्याकाळपर्यंत 9 जण ठार झाले तर अन्य 10 जण ठार झाले असल्याचेही समजले आहे. मात्र त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही, असे अन्य एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यान्गोन, मंडाले आणि राजधानी नायपितॉमधील घटनांचे वार्ताकन थांबवले गेले असल्याने त्रयस्थांमार्फत या बातमीची खातरजमा केली जाऊ शकलेली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.