अमेरिका – अमेरिकेमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याचे वृत्त समोर आली आहे. या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. अमेरिकन सीमेजवळील मेक्सिकन सिटी येथे हा प्रकार घडला आहे. हल्लेखोरांनी वाहनांवर सवार होत हा हल्ला केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाने कारवाई केली असून चार संशयितांना ठार करण्यात यश आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घटना स्थळी तात्काळ मेक्सिकन आर्मी, नॅशनल गार्ड, राज्य पोलीस आणि इतर एजन्सी घटनास्थळी दाखल झाले आहे.
गोळीबारानंतर रेनोसाचे महापौर माकी एस्तेर ऑर्टिज डोमिंग्यूझ यांनी ट्विटरवरुन नागरिकांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच तामाउलिपासचे राज्यपाल फ्रान्सिस्को ग्रॅसिया कॅबेझा डी वका यांनी रविवारी या घटनेचा निषेध केला आणि ठार झालेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला. हल्ल्यामागील हेतू तपासला जाईल असल्याचे ते म्हणाले.
या घटनेनंतर दोन महिलांचे अपहरण करुन त्यांना आपल्या गाडीत घेऊन जात असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे, तसेच तीन वाहने जप्त केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.