दोघांवर गुन्हा दाखल; वाळूसह दोन टेंम्पो एक डंपर ताब्यात
नगर – तालुक्यातील धनगरवाडी शिवारात पिंपळगाव माळवी तलावातून अवैध वाळू वाहतूक करणारा टेंम्पो ताब्यात घेतला असून, दोघा जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी कारवाई शिंगवे नाईक शिवारात देवनदी पात्रात एक डंपर ताब्यात घेणात आला आहे. अशा दोन्ही कारवाईत एकून 18 लाख 80 हजारांचा मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा एमआयडीसी पोलिसांनी रविवारी दुपारी केली.
आरोपी पाराजी रंगनाथ विरकर (वय-40, रा. धनगरवाडी ता.नगर), पांडुरंग नाना वाघ (रा. जेऊर, ता.जि. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना मिळालेल्या माहितीनुसार धनगरवाडी परिसरात पिंपळगाव माळवी तलावातून अवैध वाळू उपसा होत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांच्या पथकातील शिवाजी ढाकणे व त्यांचे सहकारी यांनी सापळा रचवून वाहन क्र. एम.एच.12 झेड.7398 व एम.एच. 4 एजी. 3422) असे दोन वाहने ताब्यात घेतली. त्यामध्ये 3 ब्रास वाळू सह 8 लाख 50 हजारांचा मुद्देलाम जप्त करण्यात आला. तर दुसरी कारवाई एमआयडीसी हद्दीतील शिंगवे गावच्या शिवारात देव नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा राखडी रंगाचा डंपर (क्र. 17 ए.जी.9533) एमआयडीसी पोलिसांना ताब्यात घेतला असून, 10 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार जयंत दळवी, पोलीस परशुराम नाकाडे, राहुल दळवी, अमोल गाडे यांच्या पथकाने केली आहे.