मुंबई – सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक कमी झाले. त्यामुळे या सहा दिवसात शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे 18 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या सहा दिवसांमध्ये निर्देशांकात 7.15 टक्क्यांची घट झाल्यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य आता कमी होऊन 236 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.
अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात व्याजदरात वाढ करण्यात आल्यानंतर इतर देशाच्या शेअर बाजार निर्देशांकांबरोबरच भारतीय शेअर बाजारातही विक्री चालू आहे. अमेरिकेबरोबर बऱ्याच देशांमध्ये मंदी निर्माण होण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.