सिरीयातील स्फोटात 18 ठार

जिस्ट अल शुर्घुर (सिरीया) – सिरीयाच्या वायव्येकडील भागात काल झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये डझनभर सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. जिहादींच्या ताब्यातील भागामध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामुळे मोठ्या इमारती कोसळल्या आहेत. चार मजई एक इमारत कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यांना शोधून वाचवण्यासाठी बचाव पथकाचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. सिरीयातील अल कायदाशी संबंधित गटाचे या भागावर नियंत्रण आहे. मरण पावलेल्यांमध्ये तुर्कस्तानी जिहादी सदस्यांचाही समावेश आहे.

या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र जिहादींनी ज्या वाहनातून स्फोटके आणली होती. त्याचाच स्फोट झाला असावा, असे ब्रिटनस्थित सिरीयातील मानवाधिकार निरीक्षक गटाने म्हटले आहे. हा स्फोट बाजारपेठेजवळच झाला, असे या गटाचे प्रमुख रामी अब्देल राहमान यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.