मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच अवैध गुन्हेगारीच्या आकड्यामध्ये वाढ होत आहे. राज्यातील लॉकडाऊनमध्ये अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर राज्य उतपादन शुल्क विभागाने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून काल एका दिवसात 179 गुन्ह्यांची नोंद केली आहे.
या प्रकरणी 60 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे रु. 39.66 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.लॉकडाऊनमध्ये अवैध मद्य निर्मिती, विक्री करणाऱ्यांविरुद्ध उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून, 24 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत राज्यात 1752 गुन्हे नोंदविण्यात आले असून 657 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, 63 वाहने जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण 4.26 कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून 1 हजार 135 इतका आहे. आज जवळपास 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. बुधवारी तब्बल 8 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 16 झाली आहे.आतापर्यंत ससूनमध्ये 11, डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये 1, नोबेल 1, इनामदार हॉस्पिटलमध्ये 1, औंध सिव्हिल रुग्णालयात 1, डीएमएच रुग्णालयात 1, आशा 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.